Nagpur : दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, फडणवीसांची विधिमंडळात घोषणा
मुंबई : दीक्षाभूमी परिसरात चालू असलेल्या भूमिगत पार्गिंकच्या कामाला आंबेडकरी अनुयायांकडून विरोध केला जात आहे. हा विरोध करण्यासाठी हजारो आंबेडकरी जनता दीक्षाभूमी परिसरात जमा झाले असून आक्रमकपणे आंदोलन करत आहेत. दरम्यान, आंबेडकरी जनतेचा वाढता विरोध आणि आंदोलन पाहून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात या पार्किंगच्या कामाला स्थगिती देण्यात येत आहे, अशी घोषणा केली.
देवेंद्र फडणवीस नेमंक काय म्हणाले?
दीक्षाभूमी येथे विकासाचा आराखडा तयार करण्यात आला. त्यासाठी राज्य सरकारने 200 कोटी रुपये दिले. हा संपूर्ण आराखडा स्मारक समितीने सुचविल्याप्रमाणे तयार करण्यात आला आहे. त्यानुसारच भूमिगत पार्किंगचे काम स्मारक समितीमार्फत हाती घेण्यात आले होते. मात्र लोकभावना लक्षात घेता त्याला स्थगिती देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एक बैठक घेऊन सर्वांच्या संमतीने निर्णय घेण्यात येईल. सर्वांचे मत विचारूनच त्यावर निर्णय घेण्यात येईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.