Devendra Fadnavis | आरबीआयकडून 60 हजार कोटी कर्ज काढून मदत शक्य : देवेंद्र फडणवीस
"कर्ज काढल्याशिवाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करता येणार नाही," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यांनी केलं. त्यांच्या या भूमिकेला देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिला आहे. "महाराष्ट्राला 1 लाख 20 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार कोटी रुपये कर्ज काढलं आहे. आणखी 60 हजार कोटी रुपयांचं कर्ज काढता येऊ शकतं," असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.