Devendra Fadnavis on Pradhan Mantri Awas Yojana : महाष्ट्रातील 20 लाख गरिबांना घरं मिळणार - फडणवीस

Continues below advertisement

महाष्ट्रातील २० लाख गरिबांना घरं मिळणार, दुचाकी आणि मोबाईल असणाऱ्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरं मिळणार, याबाबत केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी घोषणा केल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. 

आज किसान सन्मान दिवस 2024 निमित्ताने पुण्यातील केंद्र सरकारच्या कृषी विज्ञान केंद्रात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपस्थित होते. आज भारताचे कृषी मंत्री आणि ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील गरीबांसाठी मोठी घोषणा केली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार असल्याची घोषणा चौहान यांनी केली आहे. 

काय म्हणाले शिवराज सिंह चौहान?

मी महाराष्ट्राचा जावई आहे. देवेंद्र फडणवीस माझे छोटे भाऊ आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतासाठी देवाचं वरदान आहेत. तर देवाभाऊ महाराष्ट्राच्या जनतेचे जीवन बदलण्यासाठी मुख्यमंत्री झाले आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. शरद पवार कृषी मंत्री असताना 23 हजार बजेट होतं ते आता 1 लाख 27 हजार करोड आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढले पाहिजे परंतू शेतीची प्रत पुढील पिढीसाठी चांगली राहिली पाहिजे. मी ग्रामविकास मंत्री देखील आहे. प्रत्येक गरिबाकडे स्वतःचं पक्क घर असलं पाहिजे. प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत आमचा प्रयत्न आहे. तिसऱ्यांदा मोदी सरकार निवडून आले आहे. यापूर्वी 6 लाखपेक्षा अधिक लोकांना घर मिळाली होती. 13 लाख 29 हजार महाराष्ट्रातील गरिबांना घरे भेटणार आहेत. आता महाराष्ट्राला जवळपास वीस लाख घरे आपल्याला मिळालेली आहेत. पुढील एका वर्षांत ही घर भेटणार आहेत. ज्यांना यापूर्वी घर भेटले नाही, त्या सर्वांना स्वतःचे घर भेटणार आहे. ज्यांच्याकडे 2 चाकी गाडी आहे, त्यांना पण प्रधानमंत्री आवास योजनेतून घर भेटणार असल्याची घोषणा आज शिवराज सिंह चौहान यांनी केली आहे. 

कार्यक्रमावेळी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान बोलताना म्हणाले,  माझा महाराष्ट्राशी सखोल संबंध आहे. मी महाराष्ट्राचा जावई आहे. मी ग्रामीण विकास मंत्री देखील आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ग्रामीण गरीबांसाठी 19 लाख 66 हजार घरे यावर्षी देण्यात येणार आहेत. देशातील कोणत्याही राज्याला मिळालेल्या राज्यापेक्षा ही संख्या जास्त आहे. आतापर्यंत एका राज्याला एका वर्षात मिळालेली ही सर्वाधिक घरे आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram