
Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो
Devendra Fadnavis On Nitesh Rane: कधी कधी तरुण मंत्री बोलून जातात, त्यांच्याशी मी संवाद साधतो
आपल्या मुलीवर सामूहित बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप दिशा सालियनच्या वडिलांनी, सतीश सालियन यांनी केला आणि या प्रकरणाने पुन्हा एकदा तोंड वर काढलं. दिशा सालियन मृत्यूचा तपास पुन्हा एकदा करावा अशी नवीन याचिका सतीश सालियन यांनी दाखल केली आहे. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आणि किशोरी पेडणेकरांनी आपल्यावर दबाव आणला होता. अर्णब गोस्वामी आणि नितेश राणेंनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे असं या याचिकेतून म्हटलं आहे. दिशा सालियनप्रकरणी आता राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेवर लवकरच सुनावणी अपेक्षित आहे.
हे ही वाचा..
सुशांत सिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक म्हणून दिशा सालियन मुंबईत काम करत होती. 8 जून 2020 रोजी मुंबईत दिशा सालियनचा बालकनीमधून खाली पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही आत्महत्या असल्याची नोंद केली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून 2020 रोजी दिशाला लंडनमध्ये राहणाऱ्या तिच्या मैत्रिणीचा फोन आला. फोनवर बोलत ती आतमध्ये गेली. दिशाच्या लंडनमधील मैत्रिणीने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, दिशाने लॉकडाऊन अजूनही सुरू असून काम बाकी असल्याचं सांगितलं. ती थोडी चिंतेत वाटत होती. त्यानंतर तिचे मित्र आणि होणारा नवरा रोहन यांनी खोलीचा बंद असलेला दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिशा खोलीत नव्हती. खिडकीतून खाली पाहिलं तर दिशा पडलेली दिसून आली. दिशा सालियनने आत्महत्या केली नसून तिची हत्या करण्यात आली आहे असा आरोप राणे कुटुंबाकडून सातत्यानं केला गेला. बलात्कार करुन मग तिची हत्या केल्याचा आरोप नारायण राणे यांनी केला. मुंबईत एका पार्टीमध्ये दिशा सालियनवर बलात्कार झाला असून ती गरोदर होती असा गंभीर आरोप राणेंनी केला होता. दिशा सालियनवर बलात्कार होत असताना फ्लॅटबाहेर कोणत्या मंत्र्याचे सुरक्षारक्षक पहारा देत होते? असा प्रश्न नारायण राणेंनी उपस्थित केला. सुशांत सिंह राजपूतला ही गोष्ट कळाली तेव्हा त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याची हत्या करुन त्यालाही शांत करण्यात आलं असा खळबळजनक आरोप राणेंनी केला. पुढे 2022 मध्ये पुराव्यांच्याअभावी मुंबई पोलिसांनी या केसचा तपास बंद केला.