Devendra Fadnavis On Ladki Bahin : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार

Continues below advertisement

Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेतून (Mukhyamantri Ladki Bahin Yojana) तब्बल 80 लाख महिला अपात्र ठरल्या आहेत. ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण न करणे, निकषांची पूर्तता न करणे आणि अर्जातील त्रुटी ही यामागील प्रमुख कारणे आहे. अपात्र ठरलेल्या महिलांचे या योजनेंतर्गत मिळणारे 1500 रुपये बंद झाले आहेत. 80 लाख महिला अपात्र ठरल्यानंतर विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं आहे. याचदरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज पत्रकार परिषद घेत लाडकी बहीण योजनेवर मोठं विधान केलं आहे. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)

लाडकी बहीण योजना सुरु केली तेव्हा काही निकष होते. त्याद्वारे आपण पूर्तता केली होती आणि बहीणींना लाभ दिला होता. अर्थातच सरकारी पैसा खर्च करतो तेव्हा सीएजी ऑडिट होतं. योजना सुरु झाल्यावर आपण केवायसी सुरु केलं. सरकारी कर्मचारी आहेत, त्यासंदर्भात माहिती घेतली. परिवहन विभाग आहे, चारचाकी डेटाबेसची माहिती घेतली आणि त्यानंतर आपल्या लक्षात आलं, की 5 लाख असे आहेत ज्यात चारचाकी आहे. 14 हजार पुरुष निघालेत. अडीच लाख रुपयांपैक्षा उत्पन्न अधिक आहे, असे पण काहीजण निघाले. केवायसी करून घ्या सांगितलं, मात्र ती झाली नाही. त्यामुळे अपात्रांची संख्या 80 लाखांवर गेली, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी दिली. (Devendra Fadnavis On Ladki Bahin Yojana)

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola