Devendra Fadnavis :वाल्मिक कराडचा प्रश्नावर,फडणवीस म्हणाले..कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही

Continues below advertisement

मुंबई : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील कोणत्याही आरोपीला सोडणार नाही. बीडमध्ये कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. बीडचे पालकमंत्रिपद कुणाला द्यायचं हे मी, अजितदादा आणि शिंदे साहेब ठरवू अशी माहितीही त्यांनी दिली. बीडचे पालकमंत्रिपद मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांनी घ्यावे अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यावर देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. 

संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हाच प्रमुख सूत्रधार असल्याचा आरोप करत आमदार सुरेश धस यांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी बीडचे पालकमंत्रिपद घ्यावं अशी मागणीही त्यांनी या आधीही केली होती. 

बीडप्रकरणी एसआयटीची स्थापना 

सरपंच संतोष देशमुख प्रकरणा भाजप आमदार सुरेश धस यांनी नवा खुलासा केला आहे. सुरेश धस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि हत्या प्रकरणी लवकरच एसआयटी स्थापन होईल अशी माहिती दिली. एसआयटीमध्ये कोण असणार हे माहिती नाही, पण त्या आदेशावर मुख्यमंत्र्यांची सही झाल्याची माहिती आपल्याला त्यांच्या सचिवांनी दिली असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला.

बीडचा 'आका' हाच 302 चा प्रमुख सूत्रधार असून तो लवकरात लवकर आत गेला पाहिजे असंही धस यांनी म्हटलं. वाल्मिक कराडचा संबंध खंडणी प्रकरणाशी असल्याचं आधी मला वाटत होतं. पण या हत्याकांडांचा  प्रमुख सूत्रधार तोच असल्याचं माझं मत आहे असं सुरेश धस म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram