Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार? | ABP Majha

आता राजकीय विश्वातून एक मोठी बातमी... राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागणार अशी चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरु आहे. दिल्ली निवडणुकीतनंतर फडणवीसांना राष्ट्रीय पातळीवरच्या एका मोठ्या संघटनात्मक पदाची जबाबदारी किंवा केंदीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याची चर्चा सुरुय. फडणवीसांकडून मात्र ही चर्चा केवळ अफवा असल्याचं एबीपी माझाशी बोलताना म्हटलंय.  असं असलं तरी फडणवीसांना केंद्रात बोलावणं झालंच तर त्यांना कोणतं पद दिलं जाऊ शकतं याबाबत अजून कुठली माहिती समोर आलेली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola