Devendra Fadnavis Majha Vision : आम्ही शिवसेनेचं काम करू, नवाब मलिक यांचं काम करणार नाही

Continues below advertisement

Devendra Fadnavis Majha Vision : आम्ही शिवसेनेचं काम करू, नवाब मलिक यांचं काम करणार नाही

सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने जोरदार तयारी सुरु केली आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज एबीपी माझाच्या 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. 

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर जागा कमी पडल्या तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) की शरद पवार (Sharad Pawar), कोणासाठी दरवाजे उघडणार?, असा प्रश्न देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. यावर कुणाची गरज लागणार नाही, आम्ही तिघेच पुरेसे आहोत, तशी परिस्थितीची येणारच नाही...23 तारखेची वाट बघा, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्रि‍पदाचा फॉर्म्युला आम्ही निकालानंतर ठरवू. सरकार म्हणून आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आमचा चेहरा आहेत, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्रि‍पदाबाबत आम्ही ठरवलं आहे. जो काही निर्णय होईल तो निकालानंतर होईल. रोटेशनल मुख्यमंत्री अशी कोणतीही अट एकनाथ शिंदे यांनी ठेवली नाहीय, असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram