Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा

Continues below advertisement

Devendra Fadnavis CM | फडणवीस भाषणाला उठताच महाराष्ट्राचा लाडका भाऊच्या घोषणा  
Devendra Fadnavis Full Speech: महायुतीला विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळालं. अशातच आता महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? यावर गेले अनेक दिवस खलबतं सुरू होती. अशातच आता महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण? याचं उत्तर अवघ्या महाराष्ट्राला मिळाला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजप कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा पार पडणार आहे. अशातच आज विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये आपलं पहिलं भाषण केलं. या भाषणात त्यांनी त्यांच्यासोबत महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे, अजित पवार यांचे आभार मानले. तसेच, महाराष्ट्रातल्या जनतेला सांष्टांग दंडवत घातलं. त्याचप्रमाणे, फडणवीसांनी 'एक है, तो सेफ है' हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानं स्पष्ट केल्याचंही वक्तव्य केलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram