Devendra Fadanvis Phaltan Speech : निंबाळकरांवरील आरोप देवेंद्र फडणवीसांनी फेटाळले, FULL SPEECH

Continues below advertisement
फलटणमधील विकासकामांच्या उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार टीका केली. यावेळी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री शंभूराज देसाई आणि जयकुमार गोरे उपस्थित होते. 'प्रेताच्या टाळू वरच लोणी खाण्याचं राजकारण कोणी करत असेल आणि प्रत्येक गोष्टीत केवळ राजकीय भूमिका ही घेण्याचा प्रयत्न कोणी करत असेल तर तेही सहन करणाऱ्यांपैकी मी नाही,' असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला. फडणवीसांनी स्पष्ट केले की, या प्रकरणात रणजितदादा किंवा सचिनदादा यांचे नाव गोवण्याचा प्रयत्न झाला, पण यात तथ्य असते तर आपण कार्यक्रमाला आलो नसतो. यावेळी त्यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या: * नीरा-देवघर प्रकल्पातून फलटण आणि माळशिरसच्या दुष्काळी भागाला पाणी मिळाले आहे, जे यापूर्वी केवळ कागदावर होते. * माण देशातला दुष्काळ पूर्णपणे संपवून हरित मानदेश तयार करण्याचे काम सरकार करत आहे. * सांगोलासारख्या भागातही पाणी पोहोचवण्याचे काम सरकारने केले. * फलटणसाठी प्रशासकीय इमारती, नवीन रस्ते, आणि शासकीय रुग्णालयाच्या श्रेणीवाढीची घोषणा केली. * शेतकऱ्यांसाठी वीज बिल माफी योजना पाच वर्षे सुरू राहणार आणि २०२६ नंतर शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज देणार असल्याचे आश्वासन दिले. * 'लाडकी बहीण' योजना कधीही बंद होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola