Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांना मानद डाॅक्टरेट; जपानमधील कोयासान विद्यापिठाची घोषणा
Continues below advertisement
Devendra Fadnavis : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट देण्यात येणार आहे. जपानमधील कोयासान विद्यापीठाने आज ही घोषणा केली आहे. महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा तसेच औद्योगिक विकास, जलयुक्त शिवार सारख्या योजनांच्या माध्यमातून जलसंधारण क्षेत्रात केलेले कार्य आणि महाराष्ट्रात सामाजिक समानतेसाठी केलेले प्रयत्न इत्यादी उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना ही मानद डॉक्टरेट जाहीर करण्यात आली आहे. कोयासन विद्यापीठाचे डीन सोएदा सॅन यांनी आज घोषणा केली. आगामी भारत भेटीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही उपाधी प्रदान करण्यात येणार आहे.
Continues below advertisement