Devendra Fadnavis Full Speech Farmer issue ABp majha
Devendra Fadnavis Full Speech : शेतीला वीज पुरवण्यासाठी सोलर प्रकल्प, फडणवसींची अकोल्यात मोठी घोषणा
# माझी सवय आहे नेमकं बोलायचं आणि आवश्यक तेव्हढं बोलायचं. मी बोललेलो तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. # अकोला लोकसभेत तुम्ही भाजपला जिंकवलं त्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन. # अनुप धोत्रे हे संजय धोत्रेंच्या चांगल्या कामाची परंपरा चालवतील. # लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसोबतच एका चौथ्या पक्षासोबत आपल्याला लढावं लागलं. ते चौथा पक्ष म्हणजे फेक नॅरेटीव्ह. # भाजप 400 पार झाल्यावर संविधान बदलणार हे खोटा नॅरेटीव्ह पसरवण्यात आलं. # आरक्षणाची मुदत संपल्यानंतर त्याची मुदत वाढविण्याचे काम अटलबिहारी वाजपेयी यांनी केलं. # दलित आणि आदिवासी भागात आरक्षण संपणार हा प्रचार प्रभावीपणे केल्यानं या समाजाचं प्राबल्य असलेल्या भागात पराभव. # आपल्या जागा कमी झाल्या असल्या तरी आपला प्रभाव कमी झाला नाही. # आपल्याला महाविकास आघाडीपेक्षा फक्त 2 लाख मतं कमी मिळालीत. # 12 जागा आपण कमी मतांनी हारलोत. # दलित, आदिवासींना आता त्यांची चुक लक्षात आली. # गेल्या तीन महिन्यांत महाराष्ट्राचं वातावरण बदललं. # लाडक्या बहिणीचा प्रचंड त्रास मविआला होत आहे. # लाडकी बहीण योजनेसाठी पुरेसे पैसे सरकारकडे आहेत. # आमच्या बहिणींना मविआ हे सावत्र भाऊ असल्याचे लक्षात आले आहे. # 17 ऑगस्टला लाडक्या बहिणींना पहिला हफ्ता मिळेल. # मविआवाले आपले फोटो लावून लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करतायेत. # शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा सरकारचा निर्णय झाला. # काँग्रेस कशी लबाड आहे हे काल उद्धव ठाकरेंनीच सांगितलं. # वीजबील माफीवरून काँग्रेसच्या चलाखीवर स्वत: उद्धव ठाकरेच बोलले. # ही योजना काँग्रेसची लबाडाची योजना नाही # मविआ दररोज एक फेक नॅरेटीव्ह उभा करतात. # 90 हजार कोटीचा नळगंगा नदीजोड प्रकल्प विदर्भाचा चेहरामोहरा बदलेल़. # अकोला जिल्ह्यात मागच्यावेळी चार जागा तुम्ही भाजपला दिल्यात. यावेळी पाचवी बाळापूरची जागासुद्धा भाजपचीच निवडून आणा. ठाकरे गटाचे नितीन देशमुख आहेत बाळापूरचे आमदार. # महिंद्रा अँड महिंद्राचे उद्योग गुजरातला जाणार नाही हे स्वत: त्यांनीच स्पष्ट केलं. मविआने खोट्या बातम्या पसरवल्यात. # खोटे नॅरेटीव्ह पसरवून महाराष्ट्राची बदनामी करणार्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी. # मविआच्या सत्ताकाळात महाराष्ट्र औद्योगिकदृष्ट्या माघारला. # सोशल मीडियात आपल्या पक्षाची ताकद वाढवा. # लवकरच फेक नॅरेटीव्हच्या पोलखोलचा कार्यक्रम सोशल मीडियावर चालविणार. # त्या माध्यमातून लोकांपर्यंत जा.