Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले?

Continues below advertisement

Devendra Fadnavis Full PC : काळाराम मंदिरात दलितांविरोधात धमकीचं पत्रकं, फडणवीस काय म्हणाले? पोलिसांनी संपूर्ण प्रकरणाचा उलगडा केला आहे... काळाराम मंदिराच्या अवतीभवती राहणाऱ्या लोकांना धमकीचा पत्र प्रकाशित करण्यात आलं होतं.. ज्याने तो प्रकाशित केलं होतं, त्याला अटक झाली आहे.. त्याने दुसऱ्या एका व्यक्तीशी जुनं वैमनस्य काढण्यासाठी दलित समाजाला धमकी देणारा, निळे झेंडे लावू नका असं मजकूर असलेला पत्रक प्रकाशित केला होता.. ज्याने हे पत्र प्रकाशित केलंय, तोही दलित समाजाचा आहे... काहीतरी वेगळ्याच हेतूने त्याने हे पत्रक काढलं आहे... पोलीस या मागची कारण काय आहेत ते शोधून काढत आहे...    ज्याला अटक केली त्याच्याकडून चार मोबाईल आणि दोन लॅपटॉप मिळाले आहे... त्यामुळे अन्य कोणी त्याच्या पाठीशी आहेत का?? दंगल घडवण्यासाठी हे पत्रक काढण्यात आले होते का?? याचा शोध पोलीस घेत आहे...   सध्या तरी प्राथमिक दृष्ट्या एका व्यक्तीशी जुन्या वैमानस्यातून हे पत्रक काढण्याचे दिसत आहे... मात्र अटक झालेल्या व्यक्तीकडे ज्या वस्तू सापडल्या आहे, त्यामुळे त्याचा हेतू वेगळा होता का याचाही शोध घेतला जात आहे...  यापुढे देखील असे प्रयत्न होऊ शकतात... पत्र काढायचं आणि समाज माध्यमावर तो पोस्ट करायचे आणि समाजात गैरसमजुत निर्माण करून दंगल सदृश्य स्थिती निर्माण करायची असं यापुढेही होऊ शकतं.. म्हणून गृह विभाग यावर पूर्ण लक्ष ठेवून आहे... पोलीस महासंचालक आणि एसआयडी ला वस्तुस्थिती सांगितली आहे...  काही राजकीय नेत्यांनी काल तो पत्र ट्विट केलंय.. माझी त्यांना विनंती आहे, शहानिशा न करता, वस्तूस्थिती न तपासता समाज माध्यमावर पोस्ट केली तर समाजात  तेढ निर्माण होईल...  कालच्या प्रकरणात सर्व सत्य बाहेर आलाय...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram