Devendra Fadnavis | मराठा आरक्षणाला स्थगिती धक्कादायक, मात्र केंद्राकडे बोट दाखवणं चूक : देवेंद्र फडणवीस

Continues below advertisement

मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याचा निर्णय हा धक्कादायक आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मलाही पटला नाही. पण न्यायालयानं त्यांचा निर्णय दिलाय. आपण या निर्णयावर आत्मचिंतन करणं आवश्यक आहे. काही लोकं राजकीय हेतून कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. काही लोकांना असं वाटतंय की माझी जात ब्राह्मण असल्यामुळं मला टीकेचा धनी करा. मात्र मराठा समाजाला माहीत आहे की मी यासाठी किती प्रयत्न केले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

यावेळी फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत मी बेजबाबदार वक्तव्य करणार नाही. सत्ताधाऱ्यांनी संभ्रम करणारी वक्तव्य टाळावीत. काही लोकं राजकीय हेतून कसं केंद्राकडे बोट दाखवता येईल हे पाहात आहेत. राज्याचा कायदा असल्यानं केंद्राचा संबंध नाही. केंद्राला पक्षकार करणं याचिकाकर्त्यांच्या हातात. केंद्राला पक्षकार करुन काही उपयोगही नाही. केंद्राकडं बोट दाखवणं ही पळवाट आहे, असं फडणवीस म्हणाले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram