मंत्री झाले आपल्या विभागाचे राजे आणि प्रत्येक विभागात एक वाझे, देवेंद्र फडणवीसांची सरकारवर टीका
Continues below advertisement
“राज्यातील सरकारची अवस्था सध्या अशी झाली आहे की, प्रत्येक विभागाचे एकेक राजे आणि प्रत्येक विभागात एकेक वाझे”, असा टोमणा देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला लगावला आहे. प्रत्येक मंत्री स्वत:ला मुख्यमंत्री समजतो, अशी कठोर टीका करताना राज्यातील ओबीसींचे राजकीय आरक्षण पूर्ववत होत नाही, तोवर भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही, असे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले.
Continues below advertisement