Devendra Fadnavis : Aaditya Thackeray म्हणजे मर्सडीज बेबी, त्यांनी ना संघर्ष केलाय, ना पाहिलाय

Continues below advertisement

बाबरी मशीद पाडली जात असताना मी तिथे उपस्थित होतो, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला होता. फडणवीस तर 1857 च्या उठावातही असतील, असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होतं. आदित्य यांनी केलेल्या या टीकेचा आता देवेंद्र फडणवीस यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या मर्सडीज बेबींनी ना संघर्ष केला आहे, ना संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते उडवू शकतात, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram