Devendra Fadnavis : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली : ABP Majha
पहिल्याच दिवशी आज घडलेल्या प्रकारानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची बैठक बोलावली आहे. संध्याकाळी साडेसात वाजाता फडणवीसांच्या शासकीय निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर ही बैठक होणार आहे. मलिकांचा राजीनामा, आज राज्यपालांचं अर्धवट राहिलेलं अभिभाषण अशा अनेक मुद्द्यांवरून अधिवेशनात रणनीती कशी असावी यावर आज खलबतं होण्याची शक्यता आहे.