Devendra Fadnavis :शिवसेनेसोबत भावनिक तर राष्ट्रवादीसोबत राजकीय युती, फडणवीसांच्या भाषणाचा अर्थ काय?
देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत आमची युती भावनिक आहे असं म्हटलं. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरची युती राजकीय असल्याचं वक्तव्य केलं. या वक्तव्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. महाभारतातले काही दाखले देवेंद्र फडणवीस यांनी दिले. कालच्या त्यांच्या अर्ध्या तासांहून अधिकच्या भाषणामध्ये आपल्या पक्षाचे आमदार, खासदार आणि कार्यकर्त्यांच्या मनातील अनेक प्रश्नांना फडणवीसांनी उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. या सगळ्याचं सार हे नरेंद्र मोदी यांना 2024 मध्ये पुन्हा केंद्रात सत्तेत आणायचा आहे. त्यामुळे तुम्ही या गोष्टी समजून घ्या, असं होतं..