Devendra Fadnavis | राजर्षी शाहू महाराजांबद्दलच्या 'त्या' ट्वीटबाबत देवेंद्र फडणवीसांकडून दिलगिरी

Continues below advertisement
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजर्षि शाहू महाराजांच्या स्मृतिदिनी केलेल्या एका ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणी दिलगिरी व्यक्त केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांना ट्वीट करून अभिवादन केलं होतं. त्यावेळी त्यांनी छत्रपती शाहू महाराजांना 'थोर सामाजिक कार्यकर्ते' असं संबोधलं होतं. यामध्ये राजर्षी शाहू महाराजांचा उल्लेख कार्यकर्ते असा केल्यामुळे फडणवीसांविरोधात संतापाची लाट उसळली होती. सदर प्रकरणी खासदार संभाजीराजे यांनी एक ट्वीट केलं होतं. ज्यामध्ये फडणवीस यांनी माफी मागावी, अशी मागणीही केली होती. याच ट्वीटला रिप्लाय करत देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram