Devendra Fadnavis on Aurangzeb : औरंगजेब स्टेटस प्रकरणी SIT चौकशी केली जाईल : फडणवीस
Devendra Fadnavis on Aurangzeb : औरंगजेब स्टेटस प्रकरणी SIT चौकशी केली जाईल : फडणवीस
Maharashtra Vidhan Sabha Adhiveshan: औरंगजेबाच्या मुद्द्यावरून आज विधानसभेत गदारोळ झाल्याचं पाहायला मिळालं. विधानसभेत कायदा सुव्यवस्थेवरील लक्षवेधी मांडताना भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) आणि सपा आमदार अबु आझमी (Abu Azmi) यांच्या शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांचा एक नंबरचा शत्रू होता, त्या औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले गेले. औरंगजेबावर एवढं प्रेम असेल तर पाठवून द्या त्यांच्याकडे, असं म्हणत नितेश राणे यांनी भर सभागृहात म्हटलं. नितेश राणे यावेळी सातत्यानं समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांच्याकडे पाहून हातवारे करत होते. यावेळी तुम्ही माझ्याकडे बघून तुमचं म्हणणं मांडा, अशी सूचना विधानसभा अध्यक्षांनी नितेश राणेंना केली.