Devendra Fadanvis On Badlapur Crime : गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू,देवेंद्र फडणवीसांची ग्वाही

Continues below advertisement

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाच्या चौकशीसाठी आयजी दर्जाच्या अधिकारी आरती सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. एखाद्या महिला आयपीएस अधिकाऱ्याच्या नेतृत्त्वात चौकशी व्हावी, अशी भावना आहे. इतर कारवाईही तातडीने करण्यात आली आहे. पोलीस आणि राज्य सरकारकडून याप्रकरणात तात्काळ आरोपपत्र दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याशिवाय, फास्ट ट्रॅक कोर्ट स्थापन करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. नराधमांना तात्काळ शिक्षा व्हावी, यासाठी राज्य सरकार आणि पोलीस विभाग प्रयत्नशील आहे. या कारवाईची वेगाने सुरुवात झाली आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

आंदोलकांचा जमाव स्वयंस्फुर्तीने आला की कोणाच्या सांगण्यावरुन, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

बदलापूर प्रकरणातील आंदोलकांचा जमाव हा स्वयंस्फुर्तीने आला आहे का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी म्हटले की, हा जमाव स्वयंस्फुर्तीने आला किंवा नाही, याबाबत मी आता काही बोलणार नाही. आंदोलक आरोपीला फाशी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, राज्य सरकार कायदेशीरदृष्ट्या जे-जे शक्य आहे, ते सर्व करत आहे. यासंदर्भात ज्या संवेदनशीलपणे कारवाईची गरज आहे, ते पोलीस करत आहेत. ही घटना 13 ऑगस्टला उघडकीस आली. त्यानंतर तात्काळ कारवाई झाली. मात्र, त्यानंतर कोणी दिरंगाई किंवा लपवाछपवी केली आहे का, याचा तपास एसआयटी पथक करेल. दोषी अधिकाऱ्यांवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल. ही चौकशी वेगाने होईल, कारण आम्हाला लगेच कोर्टात आरोपपत्र दाखल करायचे आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram