Thackeray Vs Shinde SC Hearing : व्हिप राजकीय पक्षाकडून काढले जातात, देवदत्ता कामतांचा युक्तिवाद
Thackeray Vs Shinde SC Hearing : व्हिप राजकीय पक्षाकडून काढले जातात, देवदत्ता कामतांचा युक्तिवाद
Maharashtra Political Crisis : राज्यातील सत्तासंघर्षाच्या सुनावणीला (Maharashtra Political Crisis) आजपासून पुन्हा सुरुवात झाली आहे. आजपासून सलग तीन दिवस सुनावणी सुरू राहणार आहे. ठाकरे गटाच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला आहे. राज्यपालांच्या कामकाजावर सिंघवी यांनी टीका अभिषेक मनु सिंघवीचा (Abhishek Manu Singhvi) युक्तीवाद संपला आहे. ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांचा युक्तीवाद सुरु आहे.
सुप्रीम कोर्टात ठाकरे गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी आज जोरदार युक्तिवाद केला आहे. अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर बोट ठेवलं आहे. राज्यपालांचा बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा असून 10 व्या सुचीतील अधिकारांचा गैरवापर करण्यात येत आहे, असा युक्तिवाद सिंघवी यांनी केला आहे. ज्या मुद्द्यावर निर्णय घ्यायचाय तो हाच आहे की अध्यक्षांचे अधिकार गोठवता येतात का? तसं करणे म्हणजे दहाव्या सुचीचा अनादरच ठरेल. अपात्रतेचा निर्णय झालेला नसताना राज्यपालांनी निर्णय घेतल्याचं यापूर्वीच उदाहरण नाही. कारण हे प्रकरण केवळ कोर्टासमोर नाही तर अध्यक्षांसमोरही आहे. पक्षातल्या फुटीला राज्यपालांकडून मान्यता दिली गेली आहे. घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून झालेली ही चूक आहे. ही पक्षफूट नंतर केंद्राकडून मान्य केली गेली. 21 जूनला शिंदेंनी अध्यक्षांना लिहिलेलं पत्र आहे या पत्रात अजय चौधरींची नेमणूक चुकीची असल्याचं म्हटले आहे याची आम्हाला कल्पना आहे की, कोर्ट राज्यपालांना निर्देश देऊ शकत नाही. पण इतरवेळी अशा प्रकरणात कोर्टाचा अवमान केल्याची नोटीस पाठवता आली असती.