Dev Deepawali: नाशिक ते मुंबई, दिव्यांच्या रोषणाईने महाराष्ट्र उजळला, जेजुरीत भंडाऱ्याची उधळण

Continues below advertisement
देव दिवाळी (Dev Deepawali) आणि त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त (Tripurari Purnima) संपूर्ण महाराष्ट्र दिव्यांच्या रोषणाईने उजळून निघाला. नाशिकमध्ये (Nashik) गोदावरीच्या घाटावर हजारो दिवे लावण्यात आले होते, तर मुंबईतील (Mumbai) ऐतिहासिक बाणगंगा तलावावरही (Banganga Tank) महाआरती आणि दीपोत्सव साजरा करण्यात आला. दुसरीकडे, महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या (Jejuri) खंडेरायाच्या गडावरही दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला आणि गड दिव्यांच्या प्रकाशाने न्हाऊन निघाला. नाशिकच्या श्री काळाराम मंदिरात (Kalaram Mandir) आणि गोदावरीच्या तीरावर भाविकांनी दिवे लावण्यासाठी आणि आरतीसाठी मोठी गर्दी केली होती. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला, त्या विजयाच्या आनंदात देवांनी दिवे लावून उत्सव साजरा केला, म्हणूनच या दिवसाला 'देव दिवाळी' म्हणतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola