तमाशा कलावंतांच्या मदतीसाठी अकाऊंट नंबर जारी, मदतीचा हात पुढे करा! तुमची मदत 'इथे' पोहोचवा
मुंबई : लोककला जीवापाड जपणाऱ्या आणि या कलेवर अतोनात प्रेम असणाऱ्या तमाशा कलावंत मंगला बनसोडे आणि रघुवीर खेडकर यांनी नुकतीच माझा कट्टा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी कलावंत म्हणून आपल्या वाटेतील व्यथा आणि काळीज पिळवटून टाकणारी कहाणी सर्वांपुढे मांडली. कोरोनाच्या संकटात तमाशा कलावंतांच्या आयुष्याची झालेली परवड, त्यांचं दु:ख या दोघांनी रसिकांसमोर मांडले. लॉकडाऊनकाळात समाजातील अनेक घटकांना सरकारने मदत केली. मात्र, अद्याप तमाशा कलावंतांना कोणतीही मदत न मिळाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ज्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकांनीच आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत या कलाकारांच्या पाठीवर मायेचा हात फिरवल्याचं पाहायला मिळालं.