Highway Fine : वाहनचालकांना स्पीडचा धसका, वेगमर्यादा ओलांडल्यास महामार्गांवर कसा आकारला जातो दंड?
Continues below advertisement
केंद्र सरकारनं संशोधित मोटार वाहन कायद्यानुसार वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या चालकांकडून नवीन दंड आकारणी लागू केली आहे. त्यामुळं आता कुठल्याही महामार्गावर वेगमर्यादा ओलांडली तर चारचाकी वाहनांसाठी दोन हजार रुपये दंड निश्चित केला आहे. परंतु राज्यातील बहुतेक महामार्गांवरची वेगमर्यादा नेमकी किती आहे याबाबत अजूनही कुठे बोर्ड पहायला मिळत नाहीयत. मग वाहनचालकाला समजणार कसं की, त्या महामार्गावर वेगमर्यादा किती आहे? त्यासाठीच आम्ही औरंगाबाद ते सोलापूर महामार्गावर प्रवास करून तुमच्यासमोर वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. पाहूयात आमचा प्रतिनिधी कृष्णा केंडेचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement