Vaccination : लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी राज्य सरकार ग्लोबल टेंडर काढणार : अजित पवार
पुणे : राज्यात लसीकरण, रेमडेसिवीर इंजेक्शन्ससाठी महाराष्ट्र सरकार ग्लोबल टेंडर काढणार आहे. त्यासाठी पाच जणांची कमिटी नेमणार आहोत. मुख्य सचिव या कमिटीचे अध्यक्ष असतील. या कमिटीत वरिष्ठ अधिकारी असतील, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली आहे. ते पुण्यात बोलत होते. ते म्हणाले की, ग्लोबल टेंडर काढायच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना दिल्या आहेत. ही कंपनी ठरवेल की कोणती लस खरेदी करायची. रेमडेसिवीर आणि लस याबाबत ही कमिटी काम पाहिल, असं अजित पवारांनी सांगितलं.
Tags :
Corona Vaccination Corona Vaccine Vaccination COVID Vaccine Ajit Pawar Ajit Pawar Speech Covid Vaccnation Free Vaccine Ajit Pawar Live