Sant Tukaram Palkhi: तुकोबारायांच्या पालखीचं २० जूनला प्रस्थान ABP Majha
abp majha web team
Updated at:
08 May 2022 04:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appजगतगुरु संत तुकोबारायांची पालखी २० जूनला पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. देहू संस्थानने पालखी सोहळ्याची घोषणा केलीय. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून हा पायी पालखी सोहळा आयोजित करण्यात आला नव्हता. आता पुन्हा एकदा वारी होणार असल्याने तुकोबााची पालखी २० जूनला देहूतून निघणार आहे. या पालखी सोहळ्यात एकूण ३२९ दिंड्या सहभागी होतात. यंदा ही पालखी पुणे आणि इंदापूरमध्ये दोन दिवसांच्या मुक्कामी असेल. पायी प्रवास पूर्ण करून पालखी ९ जुलैला पंढरपूरमध्ये पोहोचेल. तर १० जुलैला आषाढी एकादशी साजरी होईल. तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखीही आळंदी इथून 21 जूनला प्रस्थान करणार आहे.