Shirdi Sai Baba Temple | साईबाबांच्या काकड आरतीसाठी 25 हजारांची मागणी; भक्तांचा आरोप

Continues below advertisement

 महाराष्ट्रासह परराज्य आणि परदेशातूनही असंख्य भाविकांची रिघ शिर्डीतील साईमंदिरात सुरुच असते. मागील काही महिन्यांपासून लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा कालावधी वगळला तर, वर्षाचे बाराही महिने इथं कमालीची गर्दी पाहायला मिळते. सध्याही लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर मंदिरं पुन्हा उघडण्याची परवानगी शासनानं दिली आणि अनेकांचे पाय (shirdi) शिर्डीकडे वळले.

ख्रिसमस (Christmas 2020), नववर्ष (new year) अशी सलगची सुट्टी आल्यामुळंही इथं तोबा गर्दी आहे. पण, यातच काही भाविकांना मात्र विचित्र अडचणींचा सामना करावा लागत आहे. परराज्यातील काही महिला भाविकांसमोर उभी राहिलेली ही अडचण म्हणजे साईंच्या दरबारी काक़ड आरतीसाठी उपस्थिती लावण्यासाठी मंदिराकडून करण्यात आलेल्या 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी.

साईबाबांच्या काकड आरतीसाठी तब्बल 25 हजार रुपयांच्या देणगीची मागणी केल्याचा आरोप काही महिला भााविकांनी केला. परराज्यातून आलेल्या महिला भाविकांच्या या आरोपामुळं एकच खळबळही माजली.

महिला भाविकांच्या या आरोपासंदर्भात 'एबीपी माझा'नं मंदिर प्रशासनाची बाजू जाणून घेण्याचाही प्रयत्न केला. ज्यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कॅमेऱ्यासमोर बोलण्यास नकार दिला. पण, अशा तक्रारी आल्या असल्यास आम्ही त्याची चौकशी करु असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram