Latur District | लातूर जिल्ह्याचं लवकरच विभाजन होणार? | ABP Majha

Continues below advertisement
लातूर जिल्ह्याच्या विभाजनाच्या हालचाली सरु झाल्या आहेत. लातूर जिल्ह्याचं विभाजन होऊन उदगीर हा नवा जिल्हा निर्माण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कार्यवाही सुरु झाली आहे. 10 जानेवारीला औरंगाबाद येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील विभागीय आयुक्तांची बैठक पार पडली. या बैठकीत उदगीर जिल्हा निर्मिती संबंधी चर्चा झाली. त्यानंतर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलं आहे. या पत्रात उदगीर जिल्हा निर्मिती संदर्भातील माहिती तात्काळ देण्यासंदर्भात सांगण्यात आलाय.तसेच प्रशासकीय इमारतीसाठी काम गतिमान करण्याच्या सूचनाही करण्यात आलीय. दरम्यान राज्याच्या इतर भागातूनही आता नव्या जिल्ह्यांच्या निर्मितीच्या मागणीचा जोर वाढलाय..बीडमधून अंबाजोगाई, नाशिकमधून मालेगाव, चंद्रपूरमधून चिमूर-ब्रह्मपुरी आणि नगरमधून श्रीरामपूर जिल्हा निर्मितीची मागणी होताना दिसतेय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram