Mumbai : डिलिव्हरी बॉयची चारित्र्य पडताळणी करा; मुंबई पोलीस आयुक्तांची सूचना ABP Majha
Continues below advertisement
डिलिव्हरी बॉयकडून होणारं नियमांचं उल्लंघन आणि लूटमारीच्या घटनांची दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नव्या सूचना केल्यात. डिलिव्हरी बॉयच्या नियुक्तीच्या वेळी चारित्र्य पडताळणी करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केलीय. याशिवाय वाहतुकीचे नियम मोडल्यासही कारवाईचे आदेश आयुक्तांनी दिलेत. पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काल फेसबुक लाईव्ह करत मुंबईकरांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयबाबत तक्रारी आल्याचं त्यांनी सांगितलं. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यास आता गुन्हा दाखल होणार आहे. यामध्ये डिलिव्हरी बॉयबरोबर कंपन्यांनाही जबाबदार धरलं जाणार आहे, असं आयुक्तांनी सांगितलं.
Continues below advertisement