पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील : संजय राऊत
पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडलं तर त्यांचे लाखो फॉलोअर्स अनाथ होतील, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मोठी घोषणा करणार आहेत. नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियापासून दूर जाण्याचा विचार करत आहे. या विषयीची माहिती पंतप्रधान मोदी यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून दिली आहे. यामुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ माजली आहे. तसेच मोदी नक्की कोणती घोषणा करण्याच्या तयारीत आहेत? यावरून राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अशातच मोदींच्या ट्वीटबाबत संजय राऊत यांना विचारलं असता, त्यांनी खोचक टोला हाणला आहे.