Delhi Blast: 'षडयंत्राचा सखोल तपास होणार', PM Narendra Modi यांचा Bhutan मधून इशारा
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या बॉम्बस्फोट (Blast) प्रकरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भूतान (Bhutan) दौऱ्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेनंतर दिल्लीत (Delhi) उच्चस्तरीय बैठक होणार असून, तपास यंत्रणांनी चौकशी सुरू केली आहे. 'या हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना आम्ही सोडणार नाही, षडयंत्राचा सखोल तपास होणार,' असा स्पष्ट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. 'काल रात्रभर तपास संस्थांच्या संपर्कात होतो आणि पीडित कुटुंबांच्या दुःखात संपूर्ण देश सहभागी आहे,' असेही ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय तपास संस्था या कारस्थानाच्या मुळापर्यंत जातील आणि दोषींना कायद्यानुसार शिक्षा केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement