Delhi Blast Update : दिल्ली स्फोटात नवा खुलासा, फरिदाबादमध्ये २५०० किलोहून अधिक स्फोटकं जप्त

Continues below advertisement
दिल्लीच्या लाल किल्ला (Red Fort) परिसरातील स्फोटाच्या तपासात मोठा खुलासा झाला असून, अटक करण्यात आलेल्या डॉक्टर मुजम्मिल शकील गनई (Dr. Muzammil Shakeel Ganaie) याच्या भाड्याच्या घरातून पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. फरीदाबादच्या (Faridabad) फतेहपूर तगा (Fatehpur Taga) गावातून तब्बल २,५६३ किलो अमोनियम नायट्रेट (Ammonium Nitrate) जप्त करण्यात आले आहे. या घटनेनंतर संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले असून, एका गावकऱ्याने 'आम्हाला खूप भीती वाटली होती' अशी प्रतिक्रिया दिली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) आपल्या हाती घेतला असून, या दहशतवादी कटात अनेक उच्चशिक्षित व्यक्तींचा समावेश असल्याचा संशय आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola