Delhi Terror Attack: राजधानी दिल्लीतील स्फोटामागे 'डॉक्टर' दहशतवाद्यांचे रॅकेट, Mastermind उमर मोहम्मदसह ६ जण सामील

Continues below advertisement
राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटाने देश हादरला असून, यात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आला आहे. तपासात एक धक्कादायक बाब समोर आली असून, या हल्ल्यामागे उच्चशिक्षित डॉक्टरांची दहशतवादी टोळी कार्यरत असल्याचे उघड झाले आहे. या टोळीचा म्होरक्या डॉ. उमर मोहम्मद हा आत्मघाती स्फोटात ठार झाला असून, पोलिसांनी फरीदाबाद, लखनऊ आणि काश्मीरमधून इतर संशयित डॉक्टरांना अटक केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 'डॉक्टर उमर मोहम्मद आणि डॉक्टर मुझम्मिल शकील यांनी राजधानी दिल्लीजवळील फरीदाबादमध्ये बॉम्ब तयार करण्याचा दहशतवादी कारखाना सुरू केला होता'. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola