Delhi Blast: 'समन्वयाचा अभाव', NSG टीमला अवजड सामानासह भिंत ओलांडावी लागली!

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या (Delhi Blast) ठिकाणी NSG आणि फॉरेन्सिक टीम (Forensic Team) तपासासाठी दाखल झाल्या आहेत. 'तपास यंत्रणांमध्ये ताळमेळचा पूर्णपणे अभाव दिसून येत आहे,' अशी माहिती घटनास्थळावरील रिपोर्टरने दिली आहे. दिल्ली पोलीस (Delhi Police) आणि इतर यंत्रणांमध्ये समन्वयाची कमतरता स्पष्टपणे दिसली, जेव्हा स्फोटाच्या तपासासाठी अवजड उपकरणांचा बॉक्स घेऊन आलेल्या NSG कमांडोंना बॅरिकेडमधून आत जाण्यास मनाई करण्यात आली. त्यामुळे, या विशेष टीमला पुरावे गोळा करण्यासाठी मोठी पेटी घेऊन थेट भिंत ओलांडून पलीकडे जावे लागले. या स्फोटात नेमकी कोणती स्फोटकं वापरण्यात आली आहेत, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आणि फॉरेन्सिक टीम त्यादृष्टीने पुरावे गोळा करत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola