Delhi Blast: 'रुग्णालयाच्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू', गृहमंत्री Amit Shah यांची माहिती
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) परिसरात झालेल्या भीषण स्फोटात (Blast) किमान आठ जण ठार झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी दिली आहे. 'रुग्णालयानं दिलेल्या माहितीनुसार आठ जणांचा मृत्यू झाला आहे', असे शाह यांनी म्हटले आहे. या घटनेनंतर शाह यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. स्फोटाची माहिती मिळताच राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG), दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि दिल्ली पोलिसांच्या (Delhi Police) विशेष पथकासह अनेक तपास यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या स्फोटात अनेक गाड्यांचे नुकसान झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. प्रत्यक्षदर्शींच्या मते हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या इमारतींच्या खिडक्यांच्या काचाही हादरल्या. सध्या संपूर्ण परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्व बाजूंनी या घटनेचा तपास सुरू आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement