Delhi Blast: लाल किल्ल्याजवळ स्फोट, Forensic पथकाकडून तपास सुरू, नमुने गोळा

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या भीषण कार स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी संध्याकाळी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ घडली, जिथे एका Hyundai i20 कारमध्ये स्फोट झाला. यानंतर, फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (FSL), राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांच्या पथकांनी घटनास्थळी पोहोचून तपास सुरू केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'स्फोटाशी संबंधित प्रत्येक बारकाव्याचा कसून तपास सध्या यंत्रणांकडून केला जात आहे'. दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायदा (UAPA) आणि स्फोटक पदार्थ कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून, दहशतवादी संबंधाच्या शक्यतेने तपास सुरू आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola