Delhi Blast: 'आम्ही लहानपणापासून इथेच राहतो', लाल किल्ल्याजवळील स्फोटाने बेघर हादरले
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी संध्याकाळी एका कारमध्ये शक्तिशाली स्फोट झाल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले, 'आवाज इतका मोठा होता की, मी खुर्चीवरून खाली पडलो, आयुष्यात असा स्फोट कधी पाहिला नाही'. हा स्फोट लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ झाला, त्यानंतर इतर ३ ते ४ वाहनांनीही पेट घेतला. घटनास्थळी अग्निशमन दल आणि एनआयए, एनएसजीची पथके दाखल झाली असून तपास सुरू आहे. या स्फोटामुळे लाल किल्ला परिसरात वर्षानुवर्षे राहणाऱ्या बेघर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे, ज्यातील अनेकांसाठी शीशगंज गुरुद्वारा आणि इतर मंदिरांमधील लंगर हा जगण्याचा आधार आहे. या घटनेनंतर दिल्ली आणि मुंबईत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement