Delhi Railway Station : नवी दिल्ली स्थानकावर चेंगराचेंगरी, प्रत्यक्षदर्शींनी सांगितली थरारक घटना
घटनास्थळी उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास दिल्ली रेल्वे स्थानकावर अचानक गडबड गोंधळ झाला. या दरम्यान प्रयागराज एक्सप्रेस आणि मगध एक्सप्रेस रेल्वेने जाण्यासाठी मोठ्या संख्येने प्रवाशांची गर्दी जमा झाली होती. या दरम्यान, अचानक रात्री साडे आठ ते नऊ वाजताच्या सुमारास प्रयागराजला जाण्यासाठी प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. प्रत्येकाला ट्रेनमध्ये जागा हवी होती. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे पकडण्यासाठी गर्दी इतकी होती की तिकीट असणाऱ्यांना देखील जागा मिळाली नाही. यामुळेच चेंगराचेंगरी होऊन ही दुर्घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.