ISIS Module Busted: दिल्लीत आत्मघातकी हल्ल्याचा कट उधळला, दोघे जेरबंद
Continues below advertisement
दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने (Delhi Police Special Cell) एक मोठे दहशतवादी मॉड्यूल उघडकीस आणले असून, दोन संशयितांना अटक केली आहे. हे दोघेही आत्मघातकी हल्ल्याच्या (Suicide Attack) तयारीत होते, अशी माहिती स्पेशल सेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेले संशयित ISIS या दहशतवादी संघटनेशी संबंधित असून, त्यापैकी एक दिल्लीचा तर दुसरा मध्य प्रदेशचा (Madhya Pradesh) रहिवासी आहे. त्यांच्याकडून अनेक संशयास्पद वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त करण्यात आले आहे. या दहशतवादी मॉड्यूलचे धागेदोरे पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी (ISI) संबंधित असल्याचा संशयही व्यक्त केला जात आहे. दिवाळीच्या काळात गर्दीच्या ठिकाणी स्फोट घडवण्याचा त्यांचा कट होता, अशी माहिती तपासात समोर आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement