
Delhi Parvesh Verma Oath Taking : प्रवेश वर्मा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
Delhi Parvesh Verma Oath Taking : प्रवेश वर्मा यांनी घेतली उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
भाजपच्या आमदार रेखा गुप्ता यांनी आज दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री म्हणून शपख घेतली. नवी दिल्लीच्या रामलीला मैदानावर त्यांचा शपथविधी सोहळा पार पडला. रेखा गुप्ता यांची काल भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आली. रेखा गुप्ता यांनी नव्व्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्या दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री ठरल्या.रेखा गुप्ता यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक जिंकली आहे. त्या शालीमार बाग मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांनी विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपला भरघोस यश मिळाल्यानंतर कोण मुख्यमंत्री होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. प्रवेश वर्मा, वीरेंद्र सचदेवा, अभय वर्मा, आशिष सूद, रवींद्र राज आणि पवन शर्मा यांसारखे अनेक दिग्गज मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत होते. पण भाजपने दिल्लीची कमान महिला नेतृत्वाकडे सोपवण्याचा निर्णय घेत रेखा गुप्ता यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.