Narayan Rane : मंत्री झाल्यानंतर अभिनंदन करावं एवढं मुख्यमंत्र्यांचं मन मोठं नाही : नारायण राणे
केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या नारायण राणे यांनी आज पदभार स्विकारला. मंत्रिपदाच्या खुर्चीवर बसतानाच नारायण राणे यांनी टीकेचा पहिला बाण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोडला आहे. मंत्रीपद मिळाल्यानंतर अभिनंदन करावं इतकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मन मोठं नाही, असं नारायण राणे म्हणाले आहेत.