Maharashtra MLC Election | महाराष्ट्रात निवडणूक घेण्यास परवानगी, उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार

Continues below advertisement
राज्यातील विधानपरिषदेच्या 9 रिक्त जागांसाठी निवडणुका घेण्यासाठी आज केंद्रीय निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक आज झाली. या बैठकीत विधानपरिषदेच्या निवडणुका घेण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे. या विधानपरिषदेच्या निवडणुकीदरम्यान कोरोनाबाबतचे सगळे निर्बंध पाळण्याचं तसंच सुरक्षित निवडणूक घेण्याचं असं आयोगाने म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या विधानपरिषद निवडणुकीबाबत या बैठकीत जवळपास सव्वा तास चर्चा झाल्याची माहिती आहे.
 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram