Delhi Blast Update: त्या कारमध्ये बसलेल्या संशयितांचा फोटो यंत्रणाच्या हाती
Continues below advertisement
दिल्लीतील (Delhi) लाल किल्ल्याजवळ (Red Fort) झालेल्या कार स्फोटाच्या (Car Blast) तपासात पोलिसांना महत्त्वाची माहिती मिळाली आहे. स्फोटासाठी वापरलेली i20 कार फरीदाबादहून (Faridabad) आल्याचा संशय असून, तिचा मार्ग शोधण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) पहाडगंज (Paharganj) आणि दर्यागंजमधील (Daryaganj) हॉटेल्सवर छापे टाकून चार संशयितांना ताब्यात घेतले आहे. 'स्फोट झालेल्या गाडीचे बॉडी पार्ट्स पोलिसांनी ताब्यात घेतलेत आणि स्फोटांच्या जागेवर शार्प नेल, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळलेल्या नाहीत,' अशी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. या स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या (CCTV footage) आधारे पुढील तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement