Delhi Blast Probe: दिल्ली स्फोटानंतर गृहमंत्री Amit Shah यांची उच्चस्तरीय बैठक, NIA-IB प्रमुख हजर.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटानंतर (Red Fort Blast) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी एक उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (NIA) महासंचालक सदानंद वसंत दाते (Sadanand Vasant Date), इंटेलिजन्स ब्युरोचे (IB) संचालक तपन डेका (Tapan Deka), दिल्लीचे पोलीस आयुक्त सतीश गोल्चा (Satish Golcha) आणि गृहसचिव गोविंद मोहन (Govind Mohan) उपस्थित राहणार आहेत. वृत्तानुसार, 'हा हल्ला कोणी केला, यामागे कोणत्या आंतरराष्ट्रीय शक्ती आहेत का, अशा विविध मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा केली जाईल.' जम्मू आणि काश्मीरचे पोलीस महासंचालक नलिन प्रभात (Nalin Prabhat) हे देखील या बैठकीत ऑनलाइन सहभागी होणार असून, देशभरात सुरू असलेल्या 'टेरर क्रॅकडाऊन' (Terror Crackdown) आणि देशाच्या अंतर्गत सुरक्षेचा आढावा घेतला जाणार आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement