Delhi Blast: 'दोषींना सोडणार नाही', PM Narendra Modi यांचा Bhutan मधून थेट इशारा.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोटात (Delhi Blast) १२ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भूतानच्या (Bhutan) दौऱ्यावरूनच हल्लेखोरांना कठोर इशारा दिला आहे. पंतप्रधान मोदींनी ठणकावले, 'ज्यांनी निष्पापांचे बळी घेतले आहेत त्या दोषींना सोडणार नाही, तपास यंत्रणा त्यांना शोधून काढतील आणि कठोर कारवाई केली जाईल'. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनीही उच्चस्तरीय बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि प्रत्येक गुन्हेगाराला शोधून काढण्याचे निर्देश दिले आहेत. या स्फोटाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) सोपवण्यात आला असून, देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement