Delhi Blast: स्फोटाच्या जागेवर शार्पनेल, खिळे, अणुकुचीदार वस्तू आढळल्या नाहीत
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून वीसहून अधिक जण जखमी झाले आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला असून, प्राथमिक तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. पोलिसांच्या तपासानुसार, 'स्फोटकांच्या जागेवरती कोणत्याही पद्धतीचे छर्रे, श्राफ्नेल हे आढळलेले नाहीत'. यामुळे हा स्फोट नेमका कशामुळे झाला, याबद्दलचे गूढ वाढले आहे. स्फोट झालेल्या गाडीचे भाग पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सर्व नऊ मृतदेहांचे शवविच्छेदन पूर्ण झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (NSG) यांच्यासह अनेक तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement