Delhi Blast Probe: संशयित Dr. Umar च्या घरमालकाचा खुलासा, 'Car माझ्या पत्त्यावर होती'
Continues below advertisement
दिल्लीत झालेल्या कार बॉम्बस्फोटाच्या (Delhi Car Blast) तपासात एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. हल्ल्यातील संशयित, डॉ. मोहम्मद उमर (Dr. Mohammad Umar), ज्या घरात पूर्वी राहत होता, त्याच्या घरमालकाने हल्ल्यात वापरलेल्या कारबद्दल (Car) महत्त्वाची माहिती दिली आहे. घरमालकाने सांगितले की उमर २०१६ ते २०२० या काळात त्यांच्या घरी राहत होता आणि गाडी त्याच्याच पत्त्यावर खरेदी केली होती. घरमालकाच्या म्हणण्यानुसार, 'गाडी हमारे नाम पे है, उसने नाम नहीं कराई। ट्रान्सफर नहीं करी वो।' या खुलाशामुळे गाडीच्या मालकी हक्काची आणि नोंदणीची (Registration) प्रक्रिया तपास यंत्रणांसाठी महत्त्वाची ठरली आहे. उमरने घर सोडताना नवीन फ्लॅट घेत असल्याचे सांगितले होते, परंतु गाडीची नोंदणी जुन्याच पत्त्यावर ठेवल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या माहितीच्या आधारे आता तपास यंत्रणा पुढील कारवाई करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement