Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट

Continues below advertisement

Delhi Blast Umar DNA Match : दिल्ली स्फोटात I 20 चालवणार डॉ. उमरच, डीएनए चाचणीवरुन स्पष्ट 

दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात महत्वपूर्ण प्रगती झाली आहे. तपास पथकांनी स्फोटस्थळी सापडलेल्या दात, हाडे, रक्त लागलेले कपड्याचे तुकडे तसेच पायाचा काही भाग फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवला होता. हे सगळे नमुने मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी यांच्या आईच्या DNA शी जुळले असल्याचे निष्पन्न झाले आहे, त्यामुळे आरोपीचे मृतदेह सापडल्याची पुष्टी मिळाली आहे.

Delhi Bomb Blast: केंद्र सरकारकडून दहशतवादी हल्ला घोषित

दुसरीकडे, या स्फोटाचा सर्वात जवळचा CCTV व्हिडिओ मिळाला आहे. या 10 सेकंदांच्या फुटेजमध्ये सायंकाळी 6.51 वाजता लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील सिग्नल हिरवा होताच, 20 हून अधिक गाड्या पुढे जात असताना, एक i20 कारमध्ये अचानक स्फोट झाला आणि मोठ्या ज्वाळा उठल्या. स्फोटामुळे आजूबाजूच्या अनेक वाहनांचे तुकडे झाले.केंद्रीय सरकारने या घटनेला दहशतवादी हल्ला म्हणून घोषित केले आहे. बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीत या कार बॉम्बस्फोटासंदर्भात अधिकृत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.तपासातील आणखी माहिती अशी की, दिल्ली पोलिसांना लाल रंगाची इको स्पोर्ट्स कार (DL10-CK-0458) चा या हल्ल्यात सहभाग असल्याची शंका होती. उशीरा मिळालेल्या माहितीवरून ही कार हरियाणातील खंदावली गावात लावारस अवस्थेत सापडली. कारचे रजिस्ट्रेशन मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी यांच्या नावावर आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola