Delhi Blast: दिल्लीतील स्फोटानंतर महाराष्ट्रात हाय अलर्ट, 'मंदिर सुरक्षा वाढवली', शिर्डी पोलिसांची माहिती.
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ला (Red Fort) आणि चांदणी चौक (Chandni Chowk) परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील शिर्डी (Shirdi), नाशिक (Nashik) आणि शेगाव (Shegaon) या प्रमुख धार्मिक स्थळांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, शिर्डीतील साईबाबा मंदिर, नाशिकमधील रामकुंड परिसर आणि शेगाव रेल्वे स्थानकावर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी सांगितले की, 'साई भक्तांसाठी आपण एंट्री पॉइंटलाच नाकाबंदी करत आहोत... मंदिरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे'. या स्फोटानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement